न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, लोणीभापकर विद्यालयाचा निकाल 100%, पळशीचे माजी सरपंच बाबा चोरमले बारावी परीक्षेत प्रथम
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता बारावीचा निकाल गुरुवार दि.25 मे रोजी जाहीर झाला. लोणीभापकर येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, लोणीभापकर एच. एस .सी. (१२ वी) परीक्षा फेब्रु./मार्च 2023 चा विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला.
गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी :-
1) चोरमले बाबा रामा – 87.83%
2) गायकवाड दीपक सत्यवान – 68.00%
3) कु. मासाळ तेजश्री नानासो – 64.00%
प्रथम क्रमांक आलेले चोरमले हे पळशी गावचे माजी सरपंच असून 2000 साली ते न्यू इंग्लिश स्कूल, लोणी भापकर येथेच दहावीत प्रथम आले होते. त्यानंतर 2012-13-14 यावर्षी डिप्लोमा सिव्हिल मध्ये सोमेश्वर पॉलिटेक्निकल कॉलेज सोमेश्वरनगर येथे प्रथम आले होते. तसेच सोमेश्वर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ते 2015-16-17 यावर्षी उच्च श्रेणीत परीक्षा पास झाले आहेत. त्यानंतर त्यांनी 2017 ते 2022 या काळात पळशी गावचे सरपंचपद भूषवले आहे. या काळात त्यांना पुणे जिल्हा परिषदेचा आदर्श सरपंच पुरस्कार देखील मिळाला आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब भापकर, सचिव बी.एस. भापकर, सहसचिव विजयसिंह भापकर, प्रशालेचे प्राचार्य संदीप जगताप तसेच शाळेचे आजी-माजी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.