प्राजक्ता मतिमंद शाळेत अमितराजे इंडस्ट्रीजकडून विद्यार्थ्यांना खाऊवाटप
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपे येथील प्राजक्ता मतिमंद शाळेत स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानंतर कल्पनाराजे प्रतापसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मतिमंद मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी मुलांना राजगिरा लाडू तसेच सफरचंद यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा सचिवपदी निवड झाल्याबद्दल काशिनाथ पिंगळे यांचा तर निखिल नाटकर यांची बारामती तालुका हल्लाकृती समिती प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल अमितराजे भोसले इंडस्ट्रीज यांच्यावतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जीवन साधना फाउंडेशन संचलित प्राजक्ता मतिमंद शाळेचे संस्थापक अध्यक्ष जयराम सुपेकर, खा.छत्रपती उदयनराजे भोसले यांचे सुपा परगणा प्रमुख सुनीलराजे भोसले, शांताराम भोसले, शशिकांत तावरे, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरुण सकट, अमोल सकट, नरेंद्र सकट तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनीलराजे भोसले यांनी केले. सुपेकर यांनी शाळेविषयीची माहिती सांगितली. तर शाळेचे व्यवस्थापक गणेश भुजबळ यांनी आभार मानले.