लोणी भापकर येथे स्व.धनंजय भाऊ देशमुख मेमोरीयल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना दप्तर वाटप
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील लोणी भापकर याठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन गरिब व गरजु मुलांना स्व. धनंजय भाऊ देशमुख मेमोरीयल ट्रस्टच्या वतीने आणि बारामती नगरपालिकेचे नगरसेवक जयसिंग बबलु देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले.
यावेळी विशाल पप्पु जाधव, अविनाश बनसोडे, अमोल मदने, संदिप पवार, सौरभ गोलांडे, मनोज मदने, मयुर खोमणे यासह जयसिंग बबलु देशमुख मित्र परिवार लोणी भापकर, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटोओळी : लोणी भापकर येथे दप्तर वाटपावेळी उपस्थित मान्यवर, शिक्षक व विद्यार्थी.