सोमेश्वर कॉलेज परीसरात कोयत्याने दहशत करणाऱ्या आरोपीच्या वडगांव निंबाळकर पोलीसांनी आवळल्या मुसक्या


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी


मु.सा. काकडे कॉलेज समोरील निरा बारामती रोडवर तेजस उर्फ दादु विजय सवाणे वय २२ वर्षे, रा. वाघळवाडी ता.बारामती जि.पुणे हा हातात लोखंडी कोयता घेवुन मोठमोठयाने आरडाओरड करुन शालेय मुलांचे समोर दहशत निर्माण असल्याने त्यास पोलीसांनी ताब्यात घेवुन त्याचेकडुन लोखंडी कोयता हस्तगत करून वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन गु. रजि.नं. ५७०/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७(२), ३७ (३), सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ११०,११२, ११७ गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक डि.एस. वारूळे हे करीत आहेत.

Advertisement

सदरची कामगिरी ही मा. श्री अंकित गोयल सो पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मा. श्री आनंद भोईटे अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग, पुणे ग्रामीण, मा. श्री गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी सो बारामती उपविभाग, बारामती यांचे मार्गदर्शनाखाली वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे श्री सचिन काळे सहा पोलीस निरीक्षक, श्री योगेश शेलार पोलीस उपनिरीक्षक, सहा. पोलीस उपनिरीक्षक दिपक वारूळे, पोलीस हवालदार रमेश नागटीळक, अनिल खेडकर, अमोल भोसले, सागर देशमाने, अमोल भुजबळ, पोपट नाळे पोलीस मित्र अजित नलवडे यांनी केली आहे.
अशा प्रकारे कोयत्याने दहशत माजविण्यांच्यावर व पसरवाणाऱ्यावर पुणे ग्रामीण हद्दीत कडक कारवाई करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page