सानिया महानवर हिची दुसरी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
मोढवे (ता.बारामती) येथील सानिया महानवर हिची चंद्रपूर (ब्रह्मपुरी) येथे होणाऱ्या दुसरी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2023-24 या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा संघामध्ये 62 किलो वजन गटामध्ये नुकतीच निवड झाली आहे.
सानिया हिने अतिशय खडतर परिस्थितीतून कुस्तीची कला जोपासली असून तिने आपले नाव तालुका, जिल्हा तसेच विभागीय स्तरावर नेले आहे.
यशवंतराव मोरे पाटील आश्रमशाळेची सानिया महानवर ही माजी विद्यार्थिनी आहे. माजी आमदार ॲड. विजयराव मोरे पाटील व शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ टेंगले सर यानी तिचे अभिनंदन केले.