राजे भोसले यांच्या जोगवडी शाखेच्या वतीने समाजभूषण पुरस्कारांचे वितरण
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांचे चुलते श्रीमंत खेळोजी राजे भोसले यांची थेट वंशावळ असणाऱ्या जोगवडी शाखेच्या वतीने दर पाच वर्षानंतर दिले जाणारे समाजभूषण पुरस्कार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे सूपा परगणा प्रमुख सुनील राजेभोसले आणि जोगवडी संस्थानच्या वतीने नुकतेच प्रदान करण्यात आले.
बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि गूलशे तालीम पुणेचे संस्थापक विजयराव जाधवराव, भूषणराव जाधवराव उपस्थित होते.
या कार्यक्रमास सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुके यांनी उपस्थितांना ऑनलाईन शुभेच्छा दिल्या व अशा प्रकारचे कार्यक्रम घेत असल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.
समाजिक क्षेत्रात योगदान असणारे ॲड.सोळसकर नाना, ॲड. विशाल बर्गे, ॲड. राहुल पवार, ॲड. विकास पवार, अजित दोरगे, ॲड. संजय सावंत, गौरव साळुंखे, केदार शितोळे यांना मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
ब्रिलियंट इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापिका कामिनी ताकवले, अभिनव फार्मसी कॉलेजच्या प्राध्यापिका कुमोदिनी पवार, श्री पद्मावती एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका प्रियांका पवार, पुरंदर उत्सव समितीचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश राजेभोसले, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे माजी विश्वस्त विनोद पवार, जयराम सुपेकर, प्रमोद भोसले, इतिहास अभ्यासक राहुल दोरगे, प्रहार संघटनेचे दौंड तालुका अध्यक्ष रमेश शितोळे, ॲड.नानासाहेब साखरे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आणि मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी शाहीर रंगराव पाटील यांनी सुंदर असा पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन छत्रपती शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल जेजुरीचे संस्थापक श्रीकांत पवार यांनी केले, तर आभार ऋषिकेश ताकवले यांनी मानले.