लोकविकास बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याच्या सदस्यपदी कीर्ती दौंडकर यांची निवड
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
समाजामध्ये विविध सामाजिक संस्था कार्यरत असतात. त्याचबरोबर समाज हितासाठी व वेळोवेळी समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक संस्था काम करत आहेत.
लोकविकास बहुउद्देशीय सामाजिक संस्था त्यातीलच एक नव्याने नावारूपास येत असून या संस्थेच्या महाराष्ट्र राज्य सदस्यपदी कीर्ती संभाजी दौंडकर यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
निवडीनंतर बोलताना कीर्ती दौंडकर यांनी समाजातील वंचित, गरीब, दुर्बल व इतर घटकांतील समाज कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी व समाजासाठी कटिबद्ध राहुन समाज उपयोगी कार्यक्रम राबवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.