लोणी भापकरच्या श्री सद्गुरु दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : वृत्तसेवा
लोणी भापकर (ता.बारामती) येथील श्री सद्गुरु दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या 107 व्या संजीवन समाधी महोत्सव सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सोमवार दि. 13 मार्च ते रविवार दि. 19 मार्च पर्यंत श्री दशभुजा दत्त संस्थान व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सुरू आहे.
संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त हभप ब्रह्मचैतन्य गुरुवर्य महाजनी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व्यासपीठ चालक हभप ढवळे महाराज व हभप सुरेखाताई दीक्षित यांच्या मार्गदर्शनाने हा अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यातील रविवार दि. 19 मार्च रोजी श्री सद्गुरू दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज यांचा संजीवन समाधी सोहळयानिमित्त सकाळी आठ ते बारा समाधीस लघु रुद्राभिषेक, आरती व भजनाचा कार्यक्रम होणार असून सायंकाळी पाच ते सात पालखी मिरवणूक व रात्री आठ ते दहा हभप बालगुडे महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे अशी माहिती श्रीदशदत्त संस्थांनचे अध्यक्ष बाळासाहेब गोलांडे यांनी दिली आहे.
लोणी भापकर पंचक्रोशीतील भाविकांनी महाराजांच्या 107 व्या संजीवन समाधी महोत्सवास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.