पळशीतील सारसम कॉलेज ऑफ फार्मसीमधील विद्यार्थ्यांचे यश

डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी

Advertisement

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या उन्हाळी परीक्षा 2023 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून सारसम कॉलेज ऑफ फार्मसीच्या डी. फार्मसीमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. नागेश गवळी सर यांनी दिली. डी. फार्मसी प्रथम वर्षामध्ये अनुक्रमेनिलम बनकर (61%), रेनुका मोरे द्वितीय (55.60%), पल्लवी शेंडगे तृतीय (55%) तर द्वितीय वर्षामध्ये अनुक्रमे काजल खोपडे प्रथम (71.27%),ऐश्वर्या केसकर द्वितीय (67.91%), गौरी शिवतारे तृतीय (66.91%) क्रमांकाने या विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नागेश गवळी यांनी कौतुक केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विभागप्रमुख प्रो. चारुशीला भिंताडे, प्रा.मंदार दुबळे, प्रा.प्रतीक लकडे, प्रा. स्वप्नाली माळशिकारे, प्रा. प्रतीक्षा जामदार, प्रा. ऋषिकेश सुतार, प्रा. राहुल महानवर, प्रा.अक्षय गदादे, प्रा.श्रावणी शिर्के, प्रा. दीपाली धायगुडे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page