डॉ.सुनिल गोरंटीवार यांची पाडेगाव ऊस संशोधन केंद्रास भेट
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
डॉ.सुनिल गोरंटीवार, संशोधन संचालक, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांनी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे दि. १४ जुलै २०२३ रोजी भेट दिली.
डॉ. राजेंद्र भिलारे ऊस विशेषज्ञ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव यांनी त्यांचे स्वागत केले. डॉ. भिलारे यांनी ऊस संशोधन केंद्राच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत या संशोधन केंद्राने प्रसारीत केलेल्या १६ वाणांची माहिती देवून या वाणाचे देशासाठी आणि राज्यासाठी असलेले योगदान विषद केले. तसेच डॉ. उबाळे यांनी प्रक्षेत्रावरील प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये घेण्यात आलेल्या विविध वाणांच्या विषयी माहिती दिली. डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी या केंद्राला देशपातळीवरील सर्वोत्कृष्ठ संशोधन केंद्र पुरस्कार तसेच सन २०२२ विद्यापीठस्तरीय उत्कृष्ठ संशोधन केंद्र पुरस्कार मिळाल्याबद्दल ऊस विशेषज्ञ, शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
संशोधन केंद्राचे उत्पन्न वाढविणे व महाराष्ट्रातील शेतकन्यांसाठी आडसाली हंगामासाठी मुलभूत ऊस बियाणे पुरवठा करण्याकरीता संशोधन केंद्रातील प्रक्षेत्रावरील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण किंवा खडीकरण करणे गरजेचे आहे असे त्यांनी नमूद केले.
या भेटीच्या वेळी संशोधन केंद्रावर घेण्यात आलेल्या प्रयोगांना, ऊस येणे मळयास तसेच या संशोधन केंद्राने विकसित केलेल्या नवीन वाणांच्या प्लॉटला त्यांनी भेट दिली. शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल करण्याचे मुलभूत काम येथे होत असल्याने अतिशय आनंद झाला असे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. सुरेश उबाळे यांनी केले.
ऊस पिकाचे अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी आधुनिक ऊस उत्पादन तंत्रज्ञानाविषयी ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे, मृदशास्त्र विभागातील डॉ. सुभाष घोडके, ऊस किटकशास्त्रज्ञ प्रा. शालीग्राम गांगुर्डे, ऊस शरीरक्रियाशास्त्रज्ञ डॉ. कैलास भोईटे, वरीष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. सुरेश उबाळे, कनिष्ठ संशोधन सहाय्यक श्रीमती डॉ. माधवी शेळके यांचेबरोबर त्यांनी संवाद साधला. कार्यक्रमाचे वेळी डॉ. किरणकुमार ओंबासे, डॉ. दत्तात्रय थोरवे, डॉ. रणजितसिंह निंबाळकर व इतर सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.