पळशीजवळ पुलाच्या कच्च्या खराब रस्त्यामुळे उसाची ट्रॉली पलटी
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : वृत्तसेवा
पळशी – वाकी रस्त्यावर कानाडवाडी चौकात ओढ्याच्या पुलाचे काम मागील पंधरा दिवसांपासून सुरू करण्यात आले परंतु त्याआधी कॉन्ट्रॅक्टरने चांगल्या प्रतीचा मुरूम टाकून साईडने कच्चा रस्ता करणे गरजेचे होते तसे न झाल्याने याठिकाणी उसाच्या ट्रॉली अडकत आहेत.
आज रविवारी सायंकाळी याठिकाणी उसाची एक ट्रॉली पलटी होऊन मोठी दुर्घटना होण्यापासून वाचली.
सध्या सोमेश्वर, साखरवाडी, शरयु आदी साखर कारखान्यांना परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस जात असून याठिकाणी चौकात ऊस वाहतुकीच्या वाहनामुळे कोंडी होत आहे.
मोठी दुर्घटना होण्याची शक्यता परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.
या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे व मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घ्यावी, अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.