पळशीत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : वृत्तसेवा
पळशी येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे रविवार दि. १९ मार्च रोजी नेत्रतापसणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबारासाठी भाजप तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, शिवधर्म फाउंडेशनचे दिपक काटे, मच्छिंद्र टिंगरे यांचे विशेष सहकार्य लाभले. नेत्रचिकित्सक डॉ. संतोष रनवरे, शरद शिर्के यांनी रुग्णांची नेत्रतपासणी केली. याकामी अजित थोरात व सुभाष गायकवाड यांनी सहकार्य केले.
यावेळी मच्छिंद्र टिंगरे, डॉ. रणवरे, माणिक काळे, रावसाहेब चोरमले यांनी नेत्रदान शिबिराविषयी मार्गदर्शन केले.
आष्टविनायक अॅप्टिकल यांच्या वतीने चष्म्याचे वाटप करण्यात आले. या शिबिरामध्ये ११४ नागरिकांची तपासणी करण्यात आली व १२ मोतीबिंदू रुग्णाना भारती हॉस्पिटल येथे मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. याप्रसंगी पळशी गावचे माजी सरपंच रावसाहेब चोरमले, माजी उपसरपंच माणिक काळे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे बारामती तालुका उपाध्यक्ष दादासाहेब करे, आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला व तरूण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद शिर्के यांनी तर आभार दादासाहेब करे यांनी मानले.