लोणी भापकरच्या आखाड्यात शेवटच्या कुस्तीत पैलवान पडळकर ठरले ढालीचे मानकरी
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
लोणी भापकर (ता. बारामती) येथील भैरवनाथ यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्त्यांच्या जंगी मैदानात सस्तेवाडीचे पैलवान संतोष पडळकरने पैलवान प्रताप हेगडे यास चितपट करत ढाल व एक्केचाळीस हजार रुपयांचे रोख बक्षिस मिळविले.
लोणी भापकर येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या भव्य कुस्ती आखाड्यात विविध जिल्ह्यातून आलेल्या पैलवानांनी आपल्या खेळीने कुस्ती शौकिनांना मंत्रमुग्ध केले.
सुरुवातीला लहान मुलांच्या कुस्त्या, त्यानंतर मुलींच्या कुस्त्या व नंतर मोठ्या कुस्त्या या आखाड्यात लावण्यात आल्या.
शेवटची मानाची कुस्ती पैलवान संतोष पडळकर व पैलवान प्रताप हेगडे यांच्यात चुरशीची लढत पाहण्यास मिळाली यामध्ये पडळकर हे विजयी ठरले. या कुस्त्या पाहण्यासाठी अनेक कुस्ती शौकिनांनी हजेरी लावली.
बाळासाहेब गोलांडे, रोहिदास ठोंबरे, मोहन गोलांडे, चेअरमन निलेश गोलांडे, सुनील गोलांडे, अशोक मदने, अर्जुन पवार आदींनी पंच म्हणून काम पाहिले.
या कुस्त्यांचे समालोचन विजय गोलांडे व पोलिस पाटील संजय गोलांडे यांनी केले.
याप्रसंगी यात्रा कमिटीचे सदस्य विठ्ठलदादा गोलांडे, अशोक गोलांडे, लक्ष्मण मदने, राजू पवार, बापू मोरे, महाराज गोलांडे, संभाजी गोलांडे तसेच भैरवनाथ यात्रा कमिटी व ग्रामस्थ लोणी भापकर यांनी सहकार्य केले.