वाघळवाडीचे सुपुत्र ओंकार हेगडे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
वाघळवाडी (ता.बारामती) येथील ओंकार दत्तात्रय हेगडे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली, पुणे जिल्हा अध्यक्ष नागेश जाधव तसेच कमिटीतील सर्व पदाधिकारी यांच्या वतीने सत्कार आयोजीत करण्यात आला.
याप्रसंगी मानव अधिकार संरक्षण समिती अध्यक्ष नागेश जाधव, सचिव सोमेश हेगडे, प्रसिद्धीप्रमुख विनोद गोलांडे, संघटक शिवाजीराव काकडे, सचिव भारतीय पत्रकार संघ बारामती तालुका सुशीलकुमार अडागळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष धुमाळ उपस्थित होते.
यावेळी बोलताना ओंकार याने प्रतिकूल परिस्थितीतून आपले ध्येय निश्चिती करून यश साध्य करण्यासाठी कसे परिश्रम घेतले याबद्दल आपले मत व्यक्त केले. त्याचबरोबर पुढील काळामध्ये मी माझी सेवा प्रामाणिकपणे व योग्य पद्धतीने करेन असे त्यांनी सांगितले, या यशामध्ये माझ्या आई-वडिलांचा मोठा वाटा आहे असेही मत मत व्यक्त केले.
मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली पुणे जिल्हा अध्यक्ष नागेश जाधव यांनी ओंकारच्या यशाबद्दल बोलताना ओंकारच्या यशाने ग्रामीण नवयुवकांना एक प्रेरणा मिळेल असे मत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page