बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मनोहर तावरे, सचिवपदी चिंतामणी क्षीरसागर तर कार्याध्यक्षपदी कल्याण पाचंगणे यांची बिनविरोध निवड
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर देवस्थान याठिकाणी पत्रकार संघाची वार्षिक सभा नुकतीच पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष वसंतराव मोरे हे होते.
अध्यक्षपदासाठी एकूण पाच इच्छुकांनी मागणी केल्यानंतर जेष्ठांनी विचार विनिमय करून अध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांची निवड केली.
नवनियुक्त कार्यकारणी पुढीलप्रमाणे-
अध्यक्ष – मनोहर तावरे
कार्याध्यक्ष – कल्याण पंचांगणे
उपाध्यक्ष : ऋषीकेश काशिद, सुनील जाधव
सचिव : चिंतामणी क्षीरसागर
सहसचिव : समीर बनकर
खजिनदार : गोरख जाधव
सहखजिनदार : सोमनाथ लोणकर
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती अध्यक्षपदी – एडवोकेट गणेश आळंदीकर.
यावेळी जेष्ठ पत्रकार जयराम सुपेकर, अशोक वेदपाठक, दत्ता माळशिकारे, संतोष शेंडकर, नाविद पठाण, विजय मोरे, सोमनाथ भिले, युवराज खोमणे, दीपक जाधव, राजेश वाघ, हेमंत गडकरी, संतोष भोसले, सचिन वाघ, सचिन पवार, विजय लकडे, यांच्यासह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.