बारामती तालुक्यातील बाबुर्डी आणि गुणवडी येथे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातुन कौशल्य विकास केंद्र सुरू
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून राज्यातील ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते हा सोहळा पार पडला. कौशल्य विकास प्रशिक्षणातून देशातील युवकांच्या जीवनात नवी पहाट येत असून समाजातील सर्व वंचित घटकांस प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्याची संधी मिळत आहे. विकसित भारत घडविण्यात कौशल्य विकास प्रशिक्षणाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे केले. या दृष्टीने महाराष्ट्राची ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रा’ची योजना महत्त्वाची आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या वतीने ३५० तालुक्यांत स्थापन करण्यात आलेल्या ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. या ५११ ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांपैकी सोमेश्वर ग्रामीण कौशल्य विकास केंद्र बाबुर्डी (लोणी पाटी) व सोमेश्वर ग्रामीण कौशल्य विकास केंद्र गुणवडी (बांदलवाडी) ही बारामती तालुक्यातील दोन केंद्र आहेत.
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. राज्यात सुरू झालेली प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही राज्याच्या विकासाला चालना देणारी ठरतील. ग्रामीण भागातील ही कौशल्य विकास केंद्र ग्रामीण रोजगारामध्ये क्रांती घडवून आणतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. बाबुर्डी येथील केंद्राचा उद्घाटन कार्यक्रम लोणीपाटी येथील गंगोत्री लॉन्स याठिकाणी पार पडला.
यावेळी बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलिप खैरे, बाबुर्डी गावचे सरपंच दत्तात्रय ढोपरे, माजी सरपंच ज्ञानेश्र्वर पोमणे, शांताराम ढोपरे, राजकुमार लव्हे, गोविंद बाचकर, तलाठी सुरेश जगताप, सोमेश्वर ग्रामीण विकास केंद्राचे अध्यक्ष सचिन साळुंखे, माळेगाव शासकीय आयटीआयचे प्राचार्य तावरेसर, सचिन देवकाते, काऱ्हाटी आयटीआयचे विद्यार्थी, शिक्षकवृंद व युवक मोठया संख्येने उपस्थित होते.