पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लोणी भापकर शाखेचा 41 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लोणी भापकर शाखेचा 41 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लोणी भापकर शाखेचा 41 वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रेय येळे, लोणी भापकर सद्गुरु शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब भापकर, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डचे उपाध्यक्ष दुर्योधन भापकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी येळे सर, दुर्योधन भापकर, रवींद्र भापकर, विजय गोलांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बँकेतील कर्मचाऱ्यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
बारामती तालुक्याच्या ग्रामीण जिरायती पट्ट्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही शाखा असूनही या शाखेचा कारभार चांगला चालविल्यामुळे येथील अधिकारी व कर्मचारी यांचे या बँकेचे संचालक दत्तात्रेय येळे यांनी कौतुक केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Advertisement


याप्रसंगी राहुल भापकर, मुरलीधर ठोंबरे, माणिक काळे, बँकेचे विभागीय अधिकारी एस. ए.जगताप, शाखाप्रमुख व्ही. ए. हिंगणे, विकास अधिकारी एम.जे.नांगरे, कॅशियर एस. बी. कांबळे, क्लार्क जी.व्ही.जाधव, एस. एन. झिटे, सहकारी संस्थांचे सचिव, बँकेचे खातेदार व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंगणे साहेब यांनी तर आभार एम.जे.नांगरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page