सायंबाचीवाडी येथील मतदार यादीतील बोगस नावे नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाईसाठी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
सायंबाचीवाडी (ता. बारामती) येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. ही यादी सदोष असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यादी दुरुस्त केली जात नसल्याने सोमवार (दि. २१) रोजी नागपंचमीचा महिलांचा सण असूनही येथील महिला व ग्रामस्थांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर घोषणा देत उपोषण केले.
या यादीत बाहेरगावातील नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. ग्रामस्थ यांच्या तक्रारीनंतर नोंदणी अधिकारी यांनी २३ फेब्रुवारी रोजी संबंधित नावे कमी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, रद्द झालेली ४७ नावे बोगस यादीत संगमताने समाविष्ट करण्यात आली आहेत. ती नावे कोणी समाविष्ट केली व का केली, असा सवाल ग्रामस्थांनी केला. अधिकान्यांनी संगनमताने हे कृत्य केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी यासाठी सायंबाचीवाडी ग्रामस्थ अधिकारी कार्यालयासमोर सोमवारी उपोषणास बसले होते.
यावेळी दुर्योधन भापकर, नारायण भापकर, भाऊसो कांबळे, जयसिंग भगत, नामदेव बिचकुले, अंकुश इंगळे, रोहिणी इंगळे, लता जगताप यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी : सायंबाचीवाडीच्या मतदार यादीतील बोगस नावे नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाईसाठी उपोषणास बसलेले कार्यकर्ते (छाया : काशिनाथ पिंगळे)