सस्तेवाडी येथे वसुबारस उत्साहात साजरी
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
सस्तेवाडी (ता.बारामती) याठिकाणी वसुबारस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. सकाळी देशी खिलार गाई आणि वासरू यांना धुवून सजविण्यात आले होते. वसूबारसच्या निमित्ताने लक्ष्मण नातू ठोंबरे यांनी गाय-वासराची सपत्नीक पूजा केली. पूजा करून त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवन्यात आला.
आश्विन कृष्ण पक्ष एकादशीच्या दिवशी वसूबारस आणि रमा एकादशी असल्याने सायंकाळी गाईची आणि वासराची पूजा करण्यात आली. लक्ष्मी देवीचे आपल्या घरी आगमन व्हावे या हेतूने वसूबारसच्या दिवशी गाय-वासराची पूजा करण्याची पद्धत आहे. सायंकाळी गाय-वासराची पूजा करताना घरातील सूवासिनी गाय-वासराच्या पायांवर पाणी घालन्यात आले, हळद-कुंकू आणि अक्षता वाहून त्यांचे औक्षण करण्यात आले अशी माहिती यावेळी लक्ष्मण ठोंबरे यांनी दिली.
यावेळी मंगल ठोंबरे, सागर ठोंबरे यांच्यासह घरातील लहान थोर हजर होते.