वाकी चोपडज ग्रामस्थांच्या पाठपुराव्यानंतर सांगवी पुणे एसटी सुरू


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील अनेक गावात सुरू असणाऱ्या एसटी गाड्या कोरोना काळात बंद करण्यात आल्या होत्या, परंतु कोरोना काळ संपला तरी अजून अनेक ठिकाणच्या आडमार्गी असणाऱ्या गावांच्या तसेच मुक्कामी असणाऱ्या एसटी बस सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे खेडोपाडी सर्वसामान्य कुटुंबातील प्रवाशांच्या जाण्या येण्याची गैरसोय होत असल्याने सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी पाठपुरावा केला होता. एसटी प्रशासनाने याची दखल घेऊन पुणे सांगवी ही बस सुरू करण्यात आली. सदरची ही बस सुरू केल्यामुळे जेष्ठ नागरिक, महिला, शेतकरी, शालेय विद्यार्थी यांची सोय होणार आहे.
कोळविहीरे, जोगवडी, मुर्टी, मोराळवाडी, कानाडवाडी, पळशी, वाकी, चोपडज अशा मोठ्या दाट लोकवस्तीच्या व आडमार्गी असणाऱ्या गावातून ही गाडी जाते.
पुणे सांगवी मुक्कामी पूर्वी चालू असलेली बस सेवा सुरू केल्यामुळे बारामती आगार व्यवस्थापक व एमआयडीसी आगार व्यवस्थापक यांचे आभार मानून स्थानक प्रमुख दत्तात्रय भोसले, चालक विजयकुमार वाघ, वाहक सचिन लोणकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
अनेक वर्षापासून बारामती आगाराची सकाळी बारामती हून वाकीमार्गे पुण्याला जाणारी व सायंकाळी पुण्याकडून वाकीमार्गे सांगवीला मुक्कामी असणारी एसटी बससेवा सुरु केल्याने प्रवाशांनी व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. कुठल्याही प्रकारच्या प्रवासी वाहतुकीची सोय नसलेल्या मार्गावर ही बस धावत असून या बसला आताही चांगला प्रतिसाद मिळेल असे मत दिलीप गाडे गुरुजी यांनी व्यक्त केले.
ग्रामपंचायत वाकीचे सरपंच किसन बोडरे, उपसरपंच हनुमंत जगताप, चोपडजचे उपसरपंच तुकाराम भंडलकर, समीर गाडेकर, हनुमंत गाडेकर, संतोष भोसले, किसनराव जगताप, प्रमोद गाडेकर, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page