पुरंदर किल्ल्यावर मुरारबाजी यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
पुरंदर किल्ल्यावरती सालाबाद प्रमाणे मुरारबाजी यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात श्रीमंत छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्याला नांदेड सिटी उद्योजक सोपानराव घुले यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आली. पुरंदरेश्वरांच्या पूजेचा मान श्री व सौ संभाजी राजे गरुड सरदार व वंदना गरुड यांना मिळाला. यावेळी मिलिंद एकबोटे यांनी मुरारबाजी व शिवाजी महाराज यांचा जीवनपट उलगडला व व्याख्यानरुपी सर्व माहिती सांगितली.
वीर मुरारबाजी यांचे वंशज संदीपजी पोतनीस साहेब यांनी दरवर्षी कोणते कोणते उपक्रम राबवायचे याची माहिती दिली.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक आप्पासाहेब पुरंदरे यांनी पुरंदर किल्ल्याची माहिती सांगितली व स्नेहभोजनाची सोय केली. यावेळी गोदाजी जगताप यांचे वंशज बाळासाहेब जगताप, राहुल दोरगे पाटील, आदेश दोरगे पाटील, धाराऊ गाडे यांचे वंशज पांडुरंग गाडे, बाबुराजे गाडे, मयुर गाडे, शांताराम भोसले, नंदकुमार भोसले, व्यापार उद्योगच्या जिल्हाध्यक्ष कामिनीताई ताकवले, जहागीरदार साधनाताई मोडक, निखिल नाटकर, अंकुश टकले, मंगेश गावडे, विकास बेलसरे इत्यादी उपस्थित होते.
यावेळी पुरंदर उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील राजे भोसले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.