पळशीमध्ये उपसरपंच मयुरी गुलदगड यांच्या वाढदिवसानिमित्त रंगला होम मिनिस्टर कार्यक्रम, महिलांच्या कलागुणांना वाव तसेच गुणवंतांचाही सत्कार
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
पळशी (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मयुरी आप्पा गुलदगड यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल तसेच वाढदिवसानिमित्त ग्रामस्थ व महिलांच्या मनोरंजनासाठी सलीम सय्यद, अनिल सावळेपाटील प्रस्तुत होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमांमध्ये महिलांसाठी तळ्यात मळ्यात, फुगा फुगवणे, एका हाताने केसात स्ट्रॉ लावणे, उखाणे, संगीत खुर्ची असे विविध खेळ घेण्यात आले व त्यानंतर विजेत्या महिलांना तसेच दहावी, बारावी व पोलीस भरती झालेल्यांचा झाडे देऊन सत्कार करण्यात आला.
होम मिनिस्टर कार्यक्रमांमध्ये प्रथम क्र. अश्विनी नायकोबा कोकरे, द्वितीय क्र. अहिल्या गणेश करे, तृतीय क्र. शोभा शंकर करे, चतुर्थ क्र. मनीषा महादेव हाके विजेत्या ठरल्या. पैठणी साडी, सोन्याची नथ, चांदीचा छल्ला, चांदीचे नाणे व इतर बक्षिसे देऊन विजेत्या महिलांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी सरपंच ताई काळे, वाघर चित्रपटाचे निर्माते राजेंद्र बरकडे, पिसूर्टीच्या माजी सरपंच सविता बरकडे, माजी सभापती भाऊसाहेब करे, माणीक काळे, आप्पासो गुलदगड, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक राजेंद्र खेत्रे, उत्तम बंडगर, ग्रामस्थ, विद्यार्थी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.