सोनगावच्या राधा काजळी खिलार जातीच्या गायीचे डोहाळे जेवण कार्यक्रम उत्साहात
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील इनामपट्टा (सोनगाव) येथील सुरज दादासो सोनवलकर यांनी सांभाळलेल्या राधा या जातिवंत पंढरपुरी काजळी खिलार गाईचे डोहाळे जेवण (ओटी भरण्याचा) कार्यक्रम नुकताच पार पडला.
या राधा कालवडीचे वय तीन वर्षे असून ती दूशी (दोन दाती) आहे. तिने हुपरी, नृसिंहवाडी, कोल्हापूर केव्हीके बारामती, इंदापूर, पिंपरी चिंचवड, मावळ अशा अनेक प्रदर्शनात सहभाग घेऊन प्रथम क्रमांकाचा मान, ट्रॉफी तसेच बक्षिसे मिळवली आहेत. या कालवडीसाठी शेंगदाणा पेंड, मकेचा भरडा, गव्हाचे पीठ, उडीद डाळ इत्यादी खुराक दिला जातो अशी माहिती सुरज सोनवलकर यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी चिकू देवकाते, विकी देवकाते, ऋषिकेश सोनवणे, अनिकेत लवटे, अनिष सोनवलकर, सचिन कोळेकर, मित्रमंडळी व नातेवाईक उपस्थित होते.
यावेळी सर्वांनी गोड पुरणपोळीच्या जेवणाचा आस्वाद घेतला.