कानाडवाडी येथे वनविभागाच्या माध्यमातुन मेंढपाळ लाभार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटप
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
कानाडवाडी (ता. बारामती) येथे रविवार दि. 30 जुलै रोजी द ग्रासलॅंड ट्रस्ट पुणे, रोटरी क्लब ॲाफ पुणे स्पोट्स सिटी, पबमॅटीक पुणे, रेस्क्यु बारामती, इको दौंड यांनी वनविभागाच्या माध्यमातुन परिसरातील सुमारे ५८ मेंढपाळ लाभार्थ्यांना सोलर विजेरी, सोलर दिवे, निर्धुर चुली व तांदुळ याचे वाटप करण्यात आले. यावेळी विश्वतेज पवार यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली तर वनपरिमंडळ अधिकारी अमोल पाचपुते यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पाचपुते म्हणाले की मेंढपाळ हे खरे वन्यजीव रक्षक असुन त्यांना वन्यजीवांपासुन काही नुकसान झाले तर वनविभाग नुकसान भरपाई देणेस कटीबद्ध आहे.सदर कार्यक्रमासाठी पोलीस पाटील भालचंद्र भोसले, वनपरिमंडळ अधिकारी प्रकाश चौधरी, वनरक्षक माया काळे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमनाथ जाधव व तेजस केसकर यांनी परिश्रम घेतले.