पीडित व्यक्तींच्या कुटुंबीयांनी केलेला हा सत्कार म्हणजे गोल्ड मेडलपेक्षा भारी


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
पीडित व्यक्तींना – न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणे, लोकांच्या अडचणी दूर करणे हा एक आमच्या कामाचाच भाग आहे. काम करत असताना अनेक वेगवेगळी मेडल मिळत असतात मात्र फिर्यादिंच्या चेहऱ्यावरील समाधान यातच आमचा खरा आनंद आहे. पीडितांनी केलेला हा आगळावेगळा सत्कार जिव्हाळ्याचा आहे अशीच काहीशी भावना वडगाव निंबाळकर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनी व्यक्त केली आहे.
दौंड तालुक्यातील बोरीबेल येथील सखाराम तुकाराम शिंदे यांची मुलगी लोणी भापकर या ठिकाणी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या मुलीला दिराकडून सातत्याने त्रास होत असल्याबाबतची तक्रार त्यांनी वडगाव निंबाळकर याठिकाणी दिली होती. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे कार्यक्षम पोलीस निरीक्षक सचिन काळे साहेब यांनी या प्रकाराची सखोल चौकशी व खात्री केली व पीडितेला न्याय मिळवून दिला.
त्यानंतर शिंदे यांनी बोरिबेल येथून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात येऊन सचिन काळेसाहेब यांचा सत्कार करणार असल्याची इच्छा व्यक्त केली होती. शिंदे यांनी आज वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये येऊन फेटा, शाल, श्रीफळ देऊन व पेढा भरवून काळेसाहेब यांचा सत्कार केला.
यावेळी शिंदे म्हणाले की, मी अनेक अधिकारी पाहिले मात्र असा प्रामाणिक अधिकारी आजपर्यंत पाहिला नाही. पोलीस स्टेशनमध्ये बऱ्याचदा पैशांची मागणी होते मात्र साहेबांनी चहा पाजून मला न्यायही दिला. आजच्या या युगात असा अधिकारी भेटणे दुर्मिळ आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page