सोने तोळ्याला 4 हजारानी स्वस्त तर चांदी किलोला 8 हजारानी स्वस्त, खरेदीसाठी सुवर्णसंधी-किरण आळंदीकर
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी नुकतेच बजेट जाहीर केले. या बजेटमध्ये सोने – चांदी वरील आयातशुल्क 10 % वरून 5 % केले असून कृषी उपकर 5 वरून 1 % केला आहे. त्यामुळे यापूर्वी सोने चांदीवर एकूण 15 % आयातशुल्क लागू होते ते 9 टक्क्यांनी कमी होऊन 6 टक्के आयातशुल्क आकारले जाणार असल्याने आज सोने – चांदी बाजारात सोने तोळ्याला 4 हजार रुपयांनी स्वस्त झाले तर चांदीचा भाव हि तोळ्याला 8 हजार रुपयांनी कमी झाला. भाव कमी झाल्याने ग्राहकांची खरेदी आणि गुंतवणूक वाढेल असे इंडिया बुलिअन ज्वेलर्स असोसिएशनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण आळंदीकर यांनी सांगितले. नुकतीच IBJA या सराफ असोसिएशनच्या वतीने आयातशुल्क कमी करणेबाबत केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली होती ती सरकारने मान्य केल्याने सराफ व्यवसायिकांसह ग्राहकांनी देखील समाधान व्यक्त केल्याचेही आळंदीकर यांनी सांगितले. याबाबत पुढे बोलताना इब्जाचे पश्चिम महाराष्ट्र संचालक अमृतराज मालेगांवकर यांनी सांगितले कि, आयात शुल्कामुळे सोन्याचे भाव सध्या कमी झाले असले तरी भविष्यात आंतरराष्ट्रीय घडामोडीमूळे व सोने – चांदी वर GST शुल्क वाढण्याची शक्यता असल्याने दिवाळीपर्यंत भाववाढ होण्याची शक्यता असून ज्यांचेकडे दिवाळी नंतर लग्न कार्य आहे किंवा ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांना खरेदीसाठी हि चांगली संधी आहे.