शेतकऱ्यांचे डोळे लागले आभाळाकडे…पाऊस पडेना अन पुरंदर उपशाचे पाणीही सुटेना… पिके लागली जळू…कुणी पाणी देता का पाणी…पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांना बारामतीच्या जिरायती भागातील शेतकऱ्यांची अर्त हाक
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
जून महिना संपत आला तरी अजून पाऊस पडलेला नाही त्यामुळे शेतकरी तसेच वारकरी यांचे डोळे आभाळाकडे लागले असून पाऊस कधी पडेल या आशेने शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. शेतात जी पिके आहेत ती जळून जाऊ लागली आहेत तसेच चारा पिकेही संपत आल्याने शेतकऱ्यांपुढे जनावरांची चारा समस्या निर्माण झाली आहे, विहिरींनी तळ गाठला आहे त्यामुळे जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
पाऊस पडेना आणि पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणीही मिळेना या चिंतेने येथील ग्रामस्थ अधिकच चिंताग्रस्त झाले आहेत.
बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना गेली दोन महिन्यापासून शेती सिंचनासाठी असलेल्या पुरंदर उपसा सिंचन योजनेतून पाण्याची मागणी करून पैसे भरून देखील पाणी मिळत नाही. यामुळे बारामती तालुक्याच्या पश्चिम जिरायती पट्ट्यातील शेतकरी अधिकच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.
पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा व इतर निवडणुका जवळ आल्या की तालुक्यातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी दौरे करतात परंतु आत्ता अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या समस्या कुणी ऐकून घेत नाहीत. येथील मतदारांचा लोकप्रतिनिधींना प्रश्न का समजत नाही हेही न उलगडलेले एक कोडेच म्हणावे लागेल.
नाझरे कार्यालय याठिकाणी पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी एकदिवशीय जनआक्रोश आंदोलन 20 दिवसापूर्वी करण्यात आले होते. यावेळी येथील शेतकऱ्यांनी बोंबाबोंब आंदोलन केले होते.
वेळेत पाणी मिळावे, बेकायदेशीर वॉल बंद करण्यात यावेत, उच्च दाबाने पाणी मिळावे, आदी विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले होते.
यावेळी बारामती तालुक्यातील पुरंदर उपसा सिंचन योजना लाभक्षेत्राच्या गावातील पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यकारी अभियंता एम.बी.कानेटकर साहेब यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर पाणी सोडण्याची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन दिले होते परंतु यातील काही भागाला पाणी मिळाले तर काही भाग अजूनही आहे तसाच आहे त्याठिकाणी अजूनही पाणी पोहोचलेले नाही तेथील शेतकरी अजूनही पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांच्या नावाने ओरडत आहेत.
चौकट : पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांना पाण्याच्या चौकशी संदर्भात फोन केला असता ते फोन उचलत नाहीत तसेच फोन उचलल्यास व्यवस्थित उत्तरे देत नाहीत, पैसे भरूनही पाणी मिळत नाही, पंप बंद आहे अशी उडवाउडविची उत्तरे देतात…गंगाराम गुलदगड (शेतकरी,पळशी)