लोणी भापकर परिसरात मतदान शांततेत,पळशीत सकाळी मतदारांच्या रांगा
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्याच्या लोणी भापकर परिसरातील बारामती लोकसभेसाठीचे मतदान शांततेत पार पडले. प्रत्येक गावातील मतदान केंद्रावर सकाळी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. लोणी भापकर याठिकाणी 63 टक्के मतदान झाले तर पळशी याठिकाणी 65 टक्के, मासाळवाडी येथे 71% तर सायंबाचीवाडी याठिकाणी 66 टक्के मतदान झाले. मतदान केंद्रावर सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदारांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
बारामती लोकसभेत खासदार पदासाठीचे उमेदवार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या असल्यातरी याठिकाणी शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतिष्ठा पनाला लागली आहे. बारामती लोकसभेसाठी अटीतटीचा सामना होत असून बारामती तालुक्यातील प्रत्येक गावात घड्याळ व तुतारी या दोन्ही उमेदवारांना चांगले मतदान होईल असे दोन्ही कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे असे असले तरी मतदारांचे मतदान या मतपेटीत बंद करण्यात आले असून चार जूनलाच कोण खासदार होणार हे समजणार आहे त्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.