लोणी भापकर येथे गुडीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर भूमिपुत्र ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था सुरू
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
लोणी भापकर (ता.बारामती) याठिकाणी गुडीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर भूमिपुत्र ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित लोणी भापकर या संस्थेचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. या संस्थेचा शुभारंभ त्रिंबक भापकर सर, ज्ञानदेव भापकर, सुभाष भापकर सर यांच्या हस्ते करण्यात आला. अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी कर्मचारी वर्ग, संगणकीकृत कामकाज अशा सुविधांनीयुक्त अशी ही संस्था सुरू करण्यात आली आहे. या संस्थेच्या चेअरमनपदी योगेश त्रिंबक भापकर, व्हाईस चेअरमनपदी जयदीप सुभाष भापकर, तर सचिव म्हणून विजय रघुनाथ पाटोळे यांची निवड करण्यात आली आहे. या संस्थेच्या नूतन संचालक मंडळात डॉ. सागर भापकर, धनंजय भापकर, विजयकुमार गोलांडे, गणेश भापकर, उमाजी पाटोळे, देविदास लोणकर, सचिन कांबळे, शुभांगी अमराळे, सीमा भापकर यांना घेण्यात आले आहे. लोणी भापकर परिसरात सहकार रुजवून, गरीब कष्टकरी जनतेला आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे या उदात्त हेतूने हे स्वप्न उराशी बाळगून ही संस्था आम्ही सुरू करीत असल्याची माहिती संस्थेचे वतीने देण्यात आली. पंचक्रोशीतील अनेक गरजूंना छोट्या मोठ्या उद्योगांसाठी चालना मिळावी, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, महिलांना विविध योजनांद्वारे आर्थिक मदत व्हावी. तसेच वयोवृद्ध, विधवा, दीव्यांग अशा व्यक्तींना या संस्थेच्या माध्यमातून लाभ देता येईल. पंचक्रोशीतील होणाऱ्या सभासदांच्या विश्वासाला सार्थ ठरण्याचा प्रयत्न संस्थेमार्फत केला जाईल. सभासद, व्यापारी वर्गासह हितचिंतक, विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी उपस्थित दर्शवली अशी माहिती संस्थापक योगेश भापकर व जयदीप भापकर यांनी दिली.