पळशीत श्रीरामनवमी ते श्री हनुमानजयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : वृत्तसेवा
बारामती तालुक्यातील पळशी या ठिकाणी श्रीरामनवमी ते श्री हनुमान जयंती उत्सवानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह यांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचे हे 14 वे वर्ष आहे.
चैत्र शुद्ध नवमी गुरुवार दि. 30 मार्च ते चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती गुरुवार दि. 6 एप्रिल पर्यंत समस्त पळशी ग्रामस्थांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे.
यानिमित्त कलशपूजन व विनापूजन व्यासपीठ चालक हभप दत्तात्रय महाराज कोकरे (पळशी) यांच्या हस्ते करण्यात आले.
सप्ताहनिमित्त दैनंदिन कार्यक्रम- दररोज अखंड वीणा पहाटे चार ते सहा, काकडा व भजन सहा ते सात, विष्णुसहस्त्रनाम सात ते अकरा, ज्ञानेश्वरी पारायण 11 ते 12, गाथा भजन बारा ते चार, प्रवचन पाच ते सहा, हरिपाठ सहा ते सात, भोजन सात ते नऊ, कीर्तन रात्री 9 ते 11, नंतर हरिजागर.
यामध्ये प्रवचनकार म्हणून हभप हरी महाराज कदम, गौरव महाराज गाडेकर, अशोक महाराज बरडे, गौरीताई महाराज भरगुडे, प्रकाश महाराज नवले, गोरख महाराज साळुंखे यांचे प्रवचन होणार असून कीर्तनकार म्हणून हभप दत्तात्रय महाराज कोकरे, गणेश महाराज बालगुडे, संध्याताई महाराज माने, ज्ञानेश्वर महाराज होळकर, आकाश महाराज जगताप, वैष्णवीताई महारनुर टेंगले, बाळासाहेब महाराज गाडेकर यांचे कीर्तन होणार आहेत.
गुरुवारी दि.6 एप्रिलला पौर्णिमेदिवशी हनुमान जन्मोत्सव सकाळी साडेसहा वाजता त्यानंतर सकाळी दहा ते बारा हभप बाळासाहेब महाराज गाडेकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे व दुपारी 12 नंतर महाप्रसाद होईल अशी माहिती सप्ताह कमिटी यांच्याकडून देण्यात आली आहे.