किरण नरुटे पाटील यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
काझड (ता. इंदापूर) येथील किरण सुग्रीव नरुटे पाटील यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे तालुक्याचे आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या निवासस्थानी किरण नरुटे पाटील यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी किरण नरुटे पाटील म्हणाले की, संघटनेमध्ये काम करत असताना मला कायम मार्गदर्शन करणारे किशोरजी मासाळ व सर्व युवा-जेष्ठ मार्गदर्शकांचे मी विशेष आभार मानतो. त्यांच्यामुळेच मी आज या पदापर्यंत पोहोचू शकलो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर मी निष्ठेने कार्य करत राहील. पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पूर्ण करण्यास मी प्रयत्नशील राहील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार घरोघरी पोहोचवण्याचा मी सतत प्रयत्न करीत राहील. पक्षाचे सर्व नेतेमंडळी यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला जी जबाबदारी दिली आहे. ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ, पुणे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, युवानेते श्रीराज भरणे, युवकअध्यक्ष शुभम निंबाळकर, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.