पांढरवस्ती विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के, मुलींनी मारली बाजी
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल सोमवार (दि.27) रोजी जाहीर केला. पांढरवस्ती, वाकी, चोपडज, कानाडवाडी येथील यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून यामध्ये मुलींनीच बाजी मारली.
परीक्षेला एकूण 63 परीक्षार्थी बसले होते त्यापैकी विशेष प्राविण्य 28 विद्यार्थ्यांनी मिळवले. प्रथम श्रेणीत 30 तर द्वितीय श्रेणीत 5 विद्यार्थी आले.
प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांची नावे व गुण पुढीलप्रमाणे :-
1) सानिका रेवणनाथ भापकर – 93.40
2) साक्षी मच्छिंद्र नागरगोजे – 93.00
3) ऋतुजा सतीश भोसले – 89.20
यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण भोसले, संस्थेचे उपाध्यक्ष हनुमंतराव जगताप, मानदसचिव रमेश भोसले व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. जे. इनामदार तसेच पालक व ग्रामस्थ यांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.