नायकोबा देवाची मुख्य यात्रा मंगळवारी तर बुधवारी कुस्त्या
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मासाळवाडी याठिकाणी अखंड धनगर समाजाचे आराध्यदैवत असलेल्या श्री नायकोबा देवाची मुख्य यात्रा वार दि. ३ डिसेंबर रोजी आहे.
सोमवार दि.२ डिसेंबर रोजी सकाळी देवाची धार्मिक पूजाअर्चा, अभिषेक, गोड नैवेद्य, आरती, तर संध्याकाळी गुलाल उधळीत ढोल लेझीमसह पालखी, गजीनृत्य, छबिना होणार आहे.
मंगळवार दि. ३ डिसेंबर हा देवाच्या मुख्य जत्रेचा दिवस असून मध्यरात्री नंतर पूजाअर्चा, अभिषेक, आरती व त्यानंतर जत्रेला सुरवात होईल. ही यात्रा रात्री उशिरापर्यंत सुरूच असते.
तर बुधवार दि. ४ डिसेंबर रोजी दुपारी ४ नंतर कुस्त्यांचा कार्यक्रम होईल अशी माहिती यात्रा कमिटीद्वारे कळविण्यात आली आहे.
श्री नायकोबा देवस्थान यात्रा कमिटी, ग्रामपंचायत मासाळवाडी व वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन यांच्यावतीने भाविकांना सोयी सुविधेसह सहकार्य केले जाते.
श्री नायकोबा देवस्थान हे जागृत देवस्थान असून सस्तेवाडी, कानाडवाडी, पळशी, मासाळवाडी, लोणी भापकर, मुढाळे, तरडोलीसह राज्याच्या विविध भागातून भाविक याठिकाणी दरवर्षी येत असतात.