लोणी भापकर येथील सर्पमित्र विजय यादव यांचा विषारी नाग चावल्याने अखेर मृत्यू


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी


बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथील सर्पमित्र विजय यादव यांचा विषारी नाग चावल्याने अखेर आज मृत्यू झाला. हजारो सर्पांना जीवदान देणाऱ्या सर्पमित्रचा अखेर मृत्यू झाला असल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. यादव हे बारामती तालुका खरेदी विक्री संघात अनेक वर्ष कर्मचारी म्हणून सेवेत कार्यरत होते.
लोणी भापकर येथील सर्पमित्र विजय छबुराव यादव हे दिनांक 15 ऑगस्ट रोजी सर्प पकडण्यासाठी सुपा नजीक खराडेवाडी येथे गेले असताना त्यांना विषारी नागाने दंश केला होता. जनावरांसाठी बनवलेल्या मुरघासाच्या खड्ड्यात नाग पकडण्यासाठी गेले असताना त्यांना या विषारी नागाने दंश केला होता. जखमी अवस्थेतही त्यांनी विषारी नागास मोकळ्या रानांत सोडून दिले होते.
दि. १७ ऑगस्ट रोजी त्यांची प्रकृती धोक्यातुन बाहेर आली होती. मात्र आज शनिवार अखेर मृत्यूशी झुंज देत असताना त्यांची प्राणज्योत मावळली.

Advertisement

गेल्या तीस पेक्षा अधीक वर्षापासून ते सर्पमित्र म्हणून शेतकरी व गावोगावच्या ग्रामस्थ यांच्यात परिचित होते. शेतकरी अथवा इतरत्र कोणाकडूनही पैसे न घेता सापास जीवदान देण्याचे काम त्यांनी अखेरपर्यंत केले. त्यांच्या मृत्युमुळे लोणी भापकर परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ यांच्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page