चोपडजचे देविदास जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या सरचिटणीसपदी निवड


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
चोपडज (ता.बारामती) येथील सामाजिक कार्यकर्ते देविदास नानासो जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेस रोजगार स्वयंरोजगार सेल (अजित पवार गट) पुणे ग्रामीणच्या सरचिटणीसपदी नुकतीच निवड करण्यात आली.
मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात जगताप यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
आपण राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री मा. अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विचारानुसार रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या माध्यमातून पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे तसेच पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आपले सहकार्य राहील असा विश्वास राष्ट्रवादी रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या राज्यप्रमुख मेघा पवार यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादी रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या राज्यप्रमुख मेघा पवार, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख प्रशांत गवळी, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्रद्धा कंडुडे, यांच्यासह पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

पक्षाच्या वतीने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे सांभाळली जाईल तसेच जे तरुण बेरोजगार आहेत त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येतील असे देविदास जगताप यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page