मुर्टी येथे वृक्षारोपण करून भारतीय पत्रकार संघाची मीटिंग संपन्न, भारतीय पत्रकार संघाच्या बारामती तालुकाध्यक्षपदी विनोद गोलांडे यांची निवड, कार्यकारिणी जाहीर

डिजिटल महाराष्ट्र न्यूज : वृत्तसेवा

भारतीय पत्रकार संघ बारामती तालुका यांची मासिक बैठक बारामती तालुक्यातील मुर्टी याठिकाणी नुकतीच पार पडली. ही बैठक भारतीय पत्रकार संघाचे बारामती तालुकाध्यक्ष काशिनाथ पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली. पिंगळे यांनी अध्यक्षपदाची धुरा विनोद गोलांडे यांच्या हाती सोपवत भारतीय पत्रकार संघ बारामती तालुक्याची कार्यकारिणी जाहीर केली. भारतीय पत्रकार संघातील जेष्ठ पत्रकार मोहम्मद शेख, निखिल नाटकर, शरद भगत व माधव झगडे यांच्या वाढदिवसानिमित्त व जागतिक पर्यावर दिनाचे औचित्य साधून मुर्टी बाजारतळ येथे उपसरपंच किरण जगदाळे, ग्रामस्थ व भारतीय पत्रकार संघातील पदाधिकारी यांच्या उपस्थित वृक्षारोपण करण्यात आले. शरद भगत यांनी वाढदिवसानिमित्त झाडांना संरक्षण म्हणून स्व:खर्चाने ट्री गार्ड बसवले.

Advertisement

बारामती दूध संघाच्या संचालकपदी संतोष शिंदे व नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यपदी बाळासाहेब जगदाळे यांच्या निवडीबद्दल तसेच दहावीत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थीनी सिद्धी बालगुडे, श्रावणी कारंडे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कारंडे हिने महाराष्ट्र माझा काव्य सादर केले. उपसरपंच किरण जगदाळे यांनी मुर्टी ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार संघाचे स्वागत केले व मनोगतात भारतीय पत्रकार संघाचे नाव हे तालुक्यात आदराने घेतले जाते. भारतीय पत्रकार संघ विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो त्यामुळे भारतीय पत्रकार संघाची एक तालुक्यात वेगळी ओळख आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य खालीलप्रमाणे

अध्यक्ष : विनोद दिलीप गोलांडे, उपाध्यक्ष : शंतनु सोपानराव साळवे, सचिव : सुशिलकुमार विलास अडागळे, सहसचिव : दत्तात्रय जाधव, कार्याध्यक्ष : माधव श्रीहरी झगडे, संघटक : महंमद मुसाभाई शेख, हल्ला कृती समिती : निखिल संतोष नाटकर, कोषाध्यक्ष : सोमनाथ जगन्नाथ जाधव, पदवीधर सल्लागार : संभाजी नारायण काकडे, प्रसिद्धी प्रमुख : अविनाश बाळासो बनसोडे, कायदेशीर सल्लागार : अॅड गणेश आळंदीकर, संघ प्रेस फोटोग्राफर : जितेंद्र चंद्रकांत काकडे.

यावेळी मुर्टीचे उपसरपंच किरण जगदाळे, बाळासाहेब जगदाळे, संतोष शिंदे, छबन राजपुरे, हरिदास जगदाळे, पत्रकार काशिनाथ पिंगळे, विनोद गोलांडे, शंतनु साळवे, सुशिलकुमार अडागळे, दत्तात्रय जाधव, माधव झगडे, महंमद शेख, निखिल नाटकर, सोमनाथ जाधव, संभाजी काकडे, अविनाश बनसोडे, जितेंद्र काकडे, सोमनाथ लोणकर, शरद भगत व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शरद भगत यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page