लोणी भापकर येथे श्रमदानातून वनराई बंधारा पूर्ण


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील लोणी भापकर याठिकाणी महाराष्ट्र शासन कृषि विभाग व स्वच्छता अभियान ग्रुप लोणी भापकर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.17 सप्टेंबर रोजी बारामती तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल यांच्या उपस्थितीत श्रमदानातून वनराई बंधारा तयार करण्यात आला.
श्री दत्त मंदिराशेजारील ओढा याठिकाणी सकाळी सर्वांच्या श्रमदानातून वनराई बंधाऱ्याचे काम करण्यात आले. या बंधाऱ्यामुळे पाणी अडल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
यावेळी सुपेचे मंडल कृषी अधिकारी चंद्रकांत मासाळ, कृषी पर्यवेक्षक बापूराव लोदाडे, कृषीसेवक स्वप्नील गायकवाड, माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भापकर, विजयसिंह भापकर व स्वच्छता अभियान ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page