कृषिकन्यांकडून एकात्मिक तण व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
वाघापूर, जि. पुणे येथे एकात्मिक तण व्यवस्थपनाच्या विविध पद्धती याविषयी माहिती देण्यासाठी प्रात्याक्षिकाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविदयालय पुणे येथील कृषिकन्यानीं प्रात्याक्षिकाचे आयोजन केले. यावेळी शेतक-यांना पिकांमधील तण नियंत्रणासाठी करण्यात येणारे प्रतिबंधात्मक उपाय व निवारात्मक उपाय याविषयी माहिती देण्यात आली. त्याचबरोबर तणनाशक फवारणीच्या वेळी घ्यावयाची काळजी याविषयी माहिती देण्यात आली.
हे प्रात्यक्षिक करण्याकरिता महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. डी मासाळसर, कार्यक्रम समन्वय डॉ. व्ही. जे. तरडे, केंद्रप्रमुख डॉ. एस. एस. खांदवे, कार्यक्रम अधिकारी इंजि. एम.एस. पाटील यांचे मार्गदर्शन कृषिकन्यांना मिळाले.
प्रात्याक्षिकाचे आयोजन कृषिकन्या सायली हगारे, राधा गोडसे, प्रियांका घोडके, गितांजली गित्ते, स्नेहल जायभाये, ऐश्वर्या बिरादार, अर्पिता अडसूळ, साक्षी काळे, वैष्णवी घुले, अलिशा काळे, तनुजा जाधव, प्रेरणा जाधव, सृष्टी खांडेकर, गायत्री कल्हापुरे यांनी केले.