किशोर मासाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सातारा निरीक्षकपदी निवड
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पक्षबांधणी जोरात सुरु आहे. पक्षाचे सातारा निरीक्षक म्हणून बारामतीचे किशोर मासाळ यांचेकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
किशोर मासाळ हे युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यांनी कर्जत-जामखेड मतदार संघात पक्षनिरिक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी मागील विधानसभेत केली होती. अहमदनगर जिल्हा निरीक्षक म्हणून देखील जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे.
सातारा जिल्हात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे, म्हणून पक्ष बांधणीसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच युवक प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी किशोर मासाळ यांची जिल्हा पक्षनिरीक्षक म्हणून निवड केली आहे.