जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत मासाळवाडी शाळा उपविजेती
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : वृत्तसेवा
पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण कला क्रीडा व सांस्कृतिक जिल्हास्तरीय स्पर्धा २०२३-२४ नुकत्याच घेण्यात आल्या.
खो-खो चा अंतिम सामना बारामती विरुद्ध खेड असा झाला. यामध्ये खेड संघ विजयी ठरला असून बारामती संघ उपविजेता ठरला.
या खो खो स्पर्धेमध्ये (लहान गट मुले) बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मासाळवाडी या शाळेचा जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक आला.
या मुलांना शाळेचे मुख्याध्यापक भगवानराव जगदाळे, शिक्षक संपतराव मासाळ, प्रकाश भापकर, सुमन ढोले यांचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेमध्ये संघनायक प्रणव ठोंबरे, श्रेयस ठोंबरे, श्रीराज देडे, आर्यन कोळेकर, यश पिंगळे, गणेश पुणेकर, संग्राम ठोंबरे, आदित्य धायगुडे, प्रथमेश कराडे, तन्मय ठोंबरे, हर्षल बंडगर, मयुरेश धायगुडे यांनी चांगली खेळी करून संघास द्वितीय क्रमांक मिळवून दिला.
या कार्यक्रमाच्या बक्षिस वितरणास पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, बारामती पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संपतराव गावडे, विस्तार अधिकारी (वाणेवाडी बीटच्या) मंगल आगवणे, केंद्रप्रमुख हनुमंत चव्हाण आदी मान्यवर, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
मासाळवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे सरपंच मुरलीधर ठोंबरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण मासाळ यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
फोटोओळी : खो-खो स्पर्धेत उपविजेते ठरलेल्या संघास बक्षीस वितरण करताना मान्यवर, शिक्षक व विद्यार्थी.