लोणी भापकर येथील काळभैरवनाथ यात्रा गुरुवारपासून सुरू ; रविवारी तमाशा व कुस्त्या
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
लोणी भापकर (ता. बारामती) येथील श्री काळभैरवनाथ यात्रेची सुरुवात होत असून गुरुवार दि.१३ एप्रिल रोजी सायंकाळी श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. यावेळी मासाळवाडी येथील काठीचा मान असतो.
शुक्रवार दि.१४ एप्रिल रोजी दंडवत, शेरणी व मांसाहाराचा दिवस असणार आहे. शनिवार दि.१५ एप्रिल रोजी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक येथील भिमज्योत तरुण मंडळाच्या वतीने काढण्यात येणार आहे. तसेच रात्री १० नंतर देवाचा छबिना निघणार आहे.
रविवार दि. १६ एप्रिल रोजी सकाळी दत्ता महाडिक पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम, सायंकाळी ४ ते ७ पर्यंत भव्य कुस्ती आखाडा तसेच रात्री शिवकन्या बढे यांच्या लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती यात्रा कमिटीकडून देण्यात आली आहे.