पळशीची यात्रा उत्साहात संपन्न ; तमाशा, कुस्त्या शांततेत…
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : वृत्तसेवा
पळशी (ता. बारामती) येथील ग्रामदैवत हनुमान देवाची यात्रा शनिवार व रविवारी (दि.९) रोजी उत्साहात पार पडली. रामनवमीपासून ते हनुमान जन्मोत्सवापर्यंत अखंड हरिनाम सप्ताह पार पडला.
हनुमान जन्मादिवशी पहाटे भजनाचा कार्यक्रम व सकाळी ६.२९ वाजता हनुमान जन्माचा कार्यक्रम उत्साहात झाला. अखंड हरिनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी ह.भ.प. बाळासाहेब महाराज गाडेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला.
शनिवारी सकाळी दंडवतांचा कार्यक्रम होऊन धार्मिक विधी पार पडला.
रविवारी (दि.९) सकाळी १०.३० ते ३ वाजेपर्यंत पांडुरंग मुळे मांजरवाडीकर लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम झाला. या तमाशाच्या कार्यक्रमाची सुरुवात यात्रा कमिटीचे सदस्य सचिन कोळेकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी चार ते सात कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचे मैदान पार पडले. या कुस्त्यांच्या मैदानाची सुरुवात यात्रा कमिटीचे सदस्य सूर्यकांत चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आली. संध्याकाळी पांडुरंग मुळे मांजरवाडीकर लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचा शुभारंभ यात्रा कमिटीचे सदस्य विठ्ठल इजगुडे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. सोमवारी यात्रेच्या हिशोबाचा कार्यक्रम होऊन यात्रा शांततेत संपन्न झाली अशी माहिती यात्रा कमिटीदवारे देण्यात आली.