भारतीय पत्रकार संघ पुरंदर तालुका अध्यक्षपदी गोरख मेमाणे, उपाध्यक्षपदी सोमनाथ काळाणे तर सचिवपदी संदीप झगडे यांची निवड
प्रतिनिधी : (डिजिटल महाराष्ट्र न्युज)
भारतीय पत्रकार संघ पुरंदर तालुका शाखेच्या कार्यकारिणीची द्विवार्षिक निवडणुक बैठक जिल्हा परिषद विश्रामगृह जेजुरी येथे नुकतीच संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे विभागीय अध्यक्ष सिकंदर नदाफ, विभागीय परीक्षक संदीप बनसोडे व भारतीय पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष रमेश लेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली.
भारतीय पत्रकार संघाच्या पुरंदर तालुका अध्यक्षपदी गोरख मेमाणे, उपाध्यक्षपदी सोमनाथ काळाणे तर सचिवपदी संदीप झगडे यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी – जयंत पाटील, कोषाध्यक्ष – राजेंद्र जावळेकर, पदवीधर सल्लागार – रियाज सय्यद, कायदेशीर सल्लागार – ॲड. विजय भालेराव, हल्ला कृती समिती अध्यक्ष – अमोल साबळे, प्रसिद्धी प्रमुख – अस्लमजी नदाफ, महिला कार्याध्यक्ष – सायली शिर्के यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
निवडणूक अधिकारी म्हणून भारतीय पत्रकार संघ बारामती तालुका माजी अध्यक्ष काशिनाथ पिंगळे आणि जेष्ठ पत्रकार गुणशेखर जाधव यांनी कामकाज पाहिले. यावेळी पुरंदर तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते.