श्री नायकोबा देवाची यात्रा उत्साहात साजरी, हजारो भाविकांनी घेतले दर्शन, शुक्रवारी कुस्त्या
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील अखंड धनगर समाजाचे आराध्यदैवत असलेल्या श्री नायकोबा देवाची यात्रा, धार्मिक पूजाअर्चा करून उत्साहात साजरी करण्यात आली. शुक्रवार दि. १५ डिसेंबर रोजी दुपारनंतर कुस्त्यांचा आखाडा याठिकाणी पार पडणार आहे.
गुरूवार दि. १४ डिसेंबर रोजी देवाची मुख्य यात्रा उत्साहात पार पडली. याठिकाणी खेळणी, मिठाई, बॉम्बे शो, घरगुती वापराच्या वस्तू असणारे स्टॉल्स, हॉटेल्स, तसेच लोकरी पासून बनवलेले उबदार कपडे, रग, चादर, ब्लॅंकेट, जान अशी अनेक दुकाने या ठिकाणी हजर होती.
गजीनृत्य करणारी अनेक मंडळे याठिकाणी आपली कला सादर करीत होते.
श्री नायकोबा देवस्थान हे जागृत देवस्थान असून राज्याच्या विविध भागातून भाविक दरवर्षी मोठ्या प्रमाणात यात्रेसाठी याठिकाणी येत असतात.
श्री नायकोबा देवस्थान यात्रा कमिटी, मासाळवाडी व विविध गावचे पुजारी, मानकरी, भाविक व वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी बंदोबस्थासाठी उपस्थित होते.