लोणी भापकर येथे लाँड्री व्यावसायिक भिमराव पवार यांचा प्रामाणिकपणा, १० हजार रु. केले परत
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
एकीकडे पैसा, दागदागिन्यांसाठी सख्खे भाऊ पण एकमेकांचे वैरी होत असल्याचं चित्र असताना मात्र लोणी भापकरमध्ये माणुसकीचं दर्शन घडवणारी घटना नुकतीच उघडकीस आली.
लोणी भापकर येथील श्रीकृष्ण लॉन्ड्रीचे चालक भिमराव पवार यांच्याकडे इस्त्री करण्यासाठी आलेल्या कपड्यात सुमारे दहा हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली, त्यांनी संबंधित ग्राहकाचा शोध घेतला व ग्राहक राजेंद्र गोलांडे यांना ते परत करत त्यांनी या लोभी जगात आजही प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचे दर्शन घडवले. लॉन्ड्री चालकाच्या या प्रामाणिकपणाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी भाजपाचे बारामती तालुका सरचिटणीस गोरख बारवकर, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप जगदाळे, सामाजिक कार्यकर्ते गोविंद भापकर, राजेंद्र पवार, नामदेव कुंभार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.