आपत्कालीन सेवेसाठी असणाऱ्या डायल ११२ वर वारंवार खोटे कॉल देणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल!
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी पोलीस कायमच धावून येतात. अडचणीच्या काळात नागरिकांना अधिक वेगवान मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाकडुन मदतीसाठीचा डायल 112 योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून अडचणीच्या काळात 112 नंबर डायल केल्यानंतर संबंधित व्यक्तीला तात्काळ पोलिसाची मदत मिळते. काल दिनांक 08/02/2025 रोजी डायल ११२ ड्युटीला पोकॉ. वाघमोडे ब.नं. १८६ हे होते. ते डायल ११२ मशीनवर येणारे कॉलची पुर्तता वेळेत करत होतो. दिनांक 08/02/2025 रोजी रात्री 20/37 वा. डायल ११२ मशीनवर सी.एफ.एस. आयडी नं. 26342945 अन्वये कॉल देण्यात आला असुन त्यामध्ये कॉलर चा नंबर 9923807014 असा असुन त्याने स्वतःच स्वतःच्या बायकोला जीवे मारतो अशी धमकी देत आहे व शिवीगाळ करत आहे असा कॉल दिला होता. सदर कॉलची खात्री करण्यासाठी कॉलरने कॉल दिलेल्या ठिकाणी पो शि सागर वाघमोडे, कारखेल गावचे पोलीस पाटील सचिन जगताप व होमगार्ड सुरज चांदगुडे असे भेट दिली. प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली असता जो कॉल केला होता तो खोटा असल्याचे दिसून आले. त्याच्या पत्नीकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की माझा नवरा भीमा दशरथ भापकर हा विनाकारण ११२ नंबर वर व १०८ नंबर वर खोटे कॉल देत असतो. मला त्याच्यापासून कोणतेही मारहाण झालेली नाही व जिवे मारण्याचा प्रयत्नही झालेला नाही हा नेहमी वारंवार खोटे नाटे कॉल करत असतो. कॉलर भीमा दशरथ भापकर याला सदर कॉल बाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की काहीही झालेले नसताना मी असाच खोटा कॉल दिला असल्याचे सांगितले . यातील कॉलर भीमा दशरथ भापकर यांनी या अगोदरही वारंवार डायल ११२ वर खोटे नाटे कॉल केलेले आहेत. सदरचा कॉलर वारंवार जाणीवपूर्वक समजुन सवरून खोटी माहिती देवुन सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचे निदर्शनास आल्याने पो शि सागर वाघमोडे यांचे तक्रारीवरून इसम नामे भीमा दशरथ भापकर रा. कारखेल ता. बारामती जि. पुणे यांचे विरुध्द सुपा पोलीस स्टेशन येथे अ. गु. र. नंबर ९२/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २१२ (a) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सुपा पोलीस स्टेशनचे च्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अडचणीच्या काळात 112 नंबर डायल केल्यानंतर संबंधित व्यक्तीला तात्काळ पोलिसानांची मदत मिळावी यासाठी सदरची सेवा अत्यंत महत्वाची आहे. सदर सेवेचा सर्व नागरिकांनी फायदा घ्यावा परंतु काही इसम जाणीवपूर्वक डायल ११२ नंबर वर खोटे कॉल करतात. त्यांची माहिती संकलित केली जात आहे. खोटे कॉल केल्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागते;पण हाती काहीच लागत नाही. त्यामुळे पोलिसांचा वेळ वाया जातो. त्यामुळे डायल ११२ वर खोटे कॉल करून चुकीची माहिती देणाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला जावून त्याला पुढील प्रक्रियेत शिक्षा किंवा दंडही होऊ शकतो.(मनोजकुमार नवसरे)सहा. पोलीस निरीक्षकसुपा पोलीस स्टेशन