शिंदेमळा येथे मुख्याध्यापक संजय भापकर सर यांचा भव्य सत्कार व स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
न्यू इंग्लिश स्कूल लोणी भापकर व दादा जाधवराव विद्यालय जेजुरी येथील मुख्याध्यापक संजय लक्ष्मणराव भापकर तथा छोटे एस.एल.सर यांचा शासनाच्या नियत वयोमानानुसार ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्तीचा कार्यक्रम नुकताच लोणी भापकर, जेजुरी येथे पार पडला.
त्यानंतर शिंदेमळा याठिकाणी भापकर सर यांचा तानाजी पवार, हौशीराम पवार, भैरवनाथ तरुण मित्र मंडळ व शिवजयंती ग्रुप शिंदेमळा यांच्यावतीने नुकताच शाल, श्रीफळ व संपूर्ण पोशाख देऊन सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य रविंद्र भापकर, श्रीकांत भापकर, नंदकुमार मदने, विजयसिंह भापकर, दिलीप जगदाळे, हनुमंत भापकर, मानसिंग शिंदे, शरद आरडे, अविनाश बनसोडे, रमेश पवार, अनिल पवार, नितीन पवार, गणेश पवार, दिगंबर पवार, राहुल ठोंबरे, माऊली भापकर, प्रकाश भापकर, बाळू चोपडे, रामभाऊ चोपडे, पोपट सूर्यवंशी, अनिल धायगुडे, पप्पू शिंदे, मारुती मोरे, संतोष मोरे, नानासो पवार, सचिन भापकर, किरण भापकर, रोहिदास जगताप, उमेश भापकर, राजू अमराळे, संजय भोसले, नंदकुमार भापकर तसेच सविता भापकर, सार्थक भापकर, स्नेहा भापकर, आशा पवार, मनिषा पवार, रंजना पवार, वनिता ठोंबरे आदी मान्यवर व महिला उपस्थित होत्या.
