पळशीतील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराचा कलशारोहन कार्यक्रम संपन्न
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील पळशी याठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा कलश रोहनाचा कार्यक्रम आज रविवार दि. ९ मार्च रोजी संपन्न झाला. हा कार्यक्रम पणदरे येथील शिवयोगी बाळकृष्ण कोकरे महाराज यांच्या हस्ते या कलशारोहनाचा कार्यक्रम पार पडला. शनिवारी दि. ८ मार्च रोजी या कलशाची मिरवणूक चार वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत काढण्यात आली होती. तसेच रविवारी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत होमहवन व इतर विधी पार पडला. दुपारी दोन वाजता कलश रोहन करण्यात आले. त्यानंतर चार वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सभापती भाऊसाहेब करे, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब गुलदगड, पळशीच्या सरपंच ताई काळे, विठ्ठल इजगुडे, दादा शिंदे, विलास कुंभार, माणिक काळे, शिवराज माने, तानाजी कोळेकर, गंगाराम गुलदगड, हिरामण गुलदगड, अण्णा गुलदगड, अण्णा कोकरे, तसेच गावातील आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, इतर पदाधिकारी, महिला व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी गावातील सर्व भाविकांनी व ग्रामस्थांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रावसाहेब चोरमले यांनी केले.
