उत्तर माणच्या पाण्यासाठी व रस्त्यांच्या प्रश्नासाठी दिले ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन
डिजिटल महाराष्ट्र न्यूज : (दहिवडी) प्रतिनिधी
मनसेचे मार्डी विभागाचे नेते बापूराव कदम यांनी दहिवडी येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन उत्तर माण तालुक्यातील पाणी प्रश्नाच्या संदर्भात व रस्त्यांच्या दुरुस्तीच्या संदर्भात निवेदन दिले आहे. यावेळी शेतकरी व मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे निवेदन जिल्हाधिकारी यांना सुद्धा प्रत्यक्ष भेटून दिले आहे.
ये लेखी निवेदनात म्हटले आहे की उत्तर माण तालुक्यामध्ये पाणी नसल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे दूध व्यवसाय संकटात आला आहे तरी आंधळी धरणातून पाईपलाईन द्वारे पाणी सोडावे. ज्या गावात पाणीटंचाई आहेत. त्या ठिकाणी टँकर सुरू करावेत. मार्डी विभागातील रस्त्यांची दुरुस्ती करावी यामध्ये भांब -इंजबाव घाटातील रस्ता पूर्ण करावा, खुटबाव -धोत्रेवस्ती – कांळगेवस्ती -इंजबाव रस्त्याचे डांबरीकरण करावे. शिखर शिंगणापूर -मार्डी म्हसवड या रस्त्याचे दुप्पटरीकरण करावे, हिंगणी – राजेवाडी रस्त्याचे डांबरीकरण करावे, विजयनगर – पर्यंती रस्ता दुरुस्ती करून डांबरीकरण करावे, पवारवस्ती -रांजणी -भालवडी रस्त्याचे डांबरीकरण करावे, इंजबाव – गोसावीवाडी रस्त्याचे डांबरीकरण करावे, रांणद गावातील रस्त्यावरील पुलाची उंची वाढवावी व इतर मागण्यांसाठी हे निवेदन देण्यात आले आहे.