मासाळवाडी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी शंकर गोरे पाटील यांची निवड


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
मासाळवाडी (ता.बारामती) येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी शंकर गोरे पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंच मुरलीधर ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली होती. यामध्ये गोरे पाटील यांची निवड करण्यात आली.


यावेळी ग्रामपंचायत सदस्य रुपाली मासाळ, माजी सदस्य तानाजी मासाळ, भगवान धायगुडे, अशोक मासाळ, दत्तु मासाळ, भाऊसो कोळेकर, शंकर कोळेकर, नितीन मासाळ, लक्ष्मण मासाळ, वैभव मासाळ, ग्रामसेवक, गावातील तरुणवर्ग व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
यावेळी गोरे यांनी सांगितले की, गावात तंटे निर्माण होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करणार तसेच गावातील वाद गावातच मिटवण्यावर भर देणार.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page